Came across a very appealing poem today. Its writen in Marathi, posting it here with translation to the best I can.

देवासमोर उभा होतो
हताश मी हात जोडून

(I was stadning in front of the God for praying)

डोळ्यामध्ये पाणी होते

(with the eyes wait)
मनातून पूर्ण मोडून

(completely devastated)
देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही
… “
प्रश्नाच उत्तर मिळत नाही

(I said to god : I am not sure as to what shoud I do, I am not finding answers to my questions)
विश्वास ठेवदेव म्हणाला

(“Keep the Faith” : God said)
देवा सगळेच रस्ते बंद आहेत

(Almost all the doors are closed)
आशेचे दिवे मंद आहेत

(lights of hopes are flickering)
विश्वास ठेवदेव म्हणाला

(“Keep the Faith” :God said)
देवा आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही

(God the reality is that there is no scope of hope)
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही

(Time is such that,that there is no possibility of soothing tommorrow)
तर कशावर मी विश्वास ठेवावा

(then what should I belive in?)
जगामध्ये विश्वास आहे
याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ”

(Do you have any proof to show that something like “Faith” even exists in the world)
शांतपणे हसत देव मला म्हणाला

(God smiled silently ans said 🙂
पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून

(When birds fly in the sky with the wings wide open)
विश्वास असतो त्याचा, खाली पडण्यावर

(It has faith that it is not going to fall down)
मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो

(We sow the seed and water it every day)
विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर

(we do it with the faith that, plant is going to take birth)
बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,

(baby seelps in the mothers arms)
विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर

(with the faith that she is going to take care)
उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो,

(you plan for tomorrow in the night with the eyes closed)
विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर

(you do it the belife that it is going to be light the next morining)
आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन,

(you have come to me today with all your sorrows)
विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर

(and you have faith that I am going to listen to you)
असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात

(have the same faith inside and the situations change with the blink of eye)
आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही

(it is not writen any where that todays situation is what it will be forever)
उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही

(you have no idea about what it is going to be tomorrows picture)
जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे

(life exists far beyond your vision)
तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी घडत असतात

(many things happen around which are beyond your imagination)
आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात

(broken strings of the web of hopes are woven without you knowing it)
तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल

(there will come a moment where your left behind dream will be reality)
म्हणून….सगळे रस्ते बंद होतील

(so, when all the roads are closed)
तेंव्हा फक्तविश्वास ठेव

(just keep the Faith then)
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो देव !

(God stars helping you from there where you abilities come to an end…..!)